Satyajeet Tambe Full PC:चुकीचे एबी फॉर्म दिले, नाना पटोलेंकडे बोट, सत्यजीत तांबेंचे अनेक गौप्यस्फोट
Satyajeet Tambe Full PC:चुकीचे एबी फॉर्म दिले, नाना पटोलेंकडे बोट, सत्यजीत तांबेंचे अनेक गौप्यस्फोट
नाशिक: नाशिक पदवीधरसाठी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी प्रदेश कार्यालयाकडून चुकीचे एबी फॉर्म देण्यात आल्याचा गंभीर आरोप सत्यजीत तांबे यांनी केला. एबी फॉर्म हा मुद्दा लहान-सहान नाही, चुकीचा फॉर्म देऊन माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा आणि बाळासाहेब थोरातांना बदनाम करण्याचा पक्षाचा डाव होता असा आरोपही सत्यजीत तांब यांनी केला. माझ्यावर भाजपचा पाठिंबा घेतल्याचा आरोप करण्यात आला, पण चुकीचा एबी फॉर्म देण्याच्या मुद्द्यावर नाना पटोले यांनी का खुलासा केला नाही असा सवालही त्यांनी केला.
मला संधी मिळू नये, युवकांना संधी मिळू नये म्हणून वरच्या स्तरावर प्रयत्न करण्यात आले. माझ्या वडिलांना शो कॉज नोटिस न देता एक मिनिटात निलंबित करण्यात आलं असा आरोप सत्यजीत तांबे यांनी केलं. मला काँग्रेसमधून बाहेर काढण्याचं काम काही नेत्यांकडून केलं जात आहे असा आरोपही सत्यजीत तांबे यांनी केला.



















