Sanjay Shirsat On Sanjay Raut : AU नावाला काउंटर करण्यासाठी ES पुढे केलं जातंय, शिरसाटांचा टोला
Sanjay Shirsat On Sanjay Raut: ठाण्यातील बिल्डर सुरज परमार (Suraj Parmar) यांच्या आत्महत्येचा मुद्दा पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या मुद्यावरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरलं आहे. सुरज परमार यांची डायरी सापडली आहे. त्यात काही लोकांची नावे आहेत. हिंमत असेल तर याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी लावा असे आव्हान संजय राऊत यांनी सरकारले दिले आहे. तर संजय राऊत यांच्या याच आव्हानाला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उत्तर दिले आहे. AU नावाला काउंटर करण्यासाठी ES पुढे करण्यात येत असल्याचं शिरसाट म्हणाले आहे.




















