Khalil Shaikh and Ravindra Dhangekar Case : खलील शेख प्रकरणी रवींद्र धंगेकरांच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी पुढे ढकलली, कोर्टात नेमकं काय घडलं? अॅड. विजयसिंह ठोंबरेंनी दिली माहिती
Khalil Shaikh and Ravindra Dhangekar Case : रवींद्र धंगेकर यांच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी पार पडणार आहे. आज पोलीस जाणीवपूर्वक कोर्टात आले नाहीत.

Khalil Shaikh and Ravindra Dhangekar: पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांच्या आत्महत्या प्रकरणात आता माजी आमदार आणि शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर Ravindra Dhangekar) यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीवर अटकेची टांगती तलवार आहे. पोलिसांनी खलील शेख (Khalil Shaikh Suicide) आत्महत्याप्रकरणात धंगेकर पती-पत्नीसह दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी याप्रकरणात अटकेची शक्यताही बोलून दाखवली होती. रवींद्र धंगेकर आणि प्रतिभा धंगेकर या दोघांनी अटकपूर्वक जामीन अर्ज मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. धंगेकर दाम्पत्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज (सोमवारी, ता २०) सुनावणी होणार होती, पण
माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या प्रकरणातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच म्हणणं न मांडल्यामुळे सुनावणी पुढे ढकलली आहे. 22 जुलैला ही सुनावणी पार पडणार आहे.
रवींद्र धंगेकर यांच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी पार पडणार आहे. आज पोलीस जाणीवपूर्वक कोर्टात आले नाहीत. त्यांना एक दिवस म्हणणं सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. बुधवारी या प्रकरणावरती सुनावणी होईल. पोलिसांनी आज कारण काय हे सुद्धा लेखी सांगितल नाही, त्यामुळे बुधवारी ही सुनावणी ठेवण्यात आली आहे.
Khalil Shaikh and Ravindra Dhangekar: पोलिसांना एक दिवस संधी....
सुनावणीबाबत बोलताना अॅड. विजयसिंह ठोंबरे पाटील म्हणाले की, "आजच सुनावणी फिक्स केली होती जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये. आम्ही शनिवारी अर्ज दाखल केल्यानंतर, संडे असल्यामुळे आज सुनावणी फिक्स करण्यात आली होती. परंतु पोलिसांनी जाणीवपूर्वक आज त्यांचं म्हणणं मांडलेलं नाही आणि त्याच्यामुळे कोर्टाने त्यांना परवा दिवशीची तारीखेची सुनावणीची वेळ दिलेली आहे. परवा दिवशी त्याच कोर्टासमोर सुनावणी होईल. केवळ पोलिसांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं नाही म्हणून आज सुनावणी झाली नाही आणि एवढं त्याच्यापुढेसुद्धा आपल्याला सांगतो की, पोलिसांनी साधं त्यांना काय कारणामुळे म्हणणं मांडता येत नाही, याचंसुद्धा लेखी त्यांनी कुठलं कोर्टाला कळवलेलं नाहीये. त्यामुळे एक दिवस त्यांना संधी देण्यात आलेली, परवा दिवशी असं पूर्ण हियरिंग ठेवण्यात आलेलं आहे."
Khalil Shaikh and Ravindra Dhangekar: नेमकं काय आहे प्रकरण?
बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी व्हिडिओ तयार करून गळफास घेत आत्महत्या केली होती. यामध्ये त्यांनी रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे, त्यांच्या पत्नी वर्षा शेडगे यांच्यासह अनेकांना आपल्या मृत्यूसाठी जबाबदार धरले होते. यानंतर स्वारगेट पोलीस ठाण्यात माजी आमदार धंगेकरांसह 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Pune Police: पोलीस खलील शेख आणि रवींद्र धंगेकरांबद्दल काय म्हणाले?
खलील शेख हा लेबर कॉन्ट्र्रॅक्टर होता. त्याने ज्या इमारतीमध्ये आत्महत्या केली त्याच्या बाहेरच्या बाजूला चिठ्ठी चिटकवली होती. आणखी एक चिठ्ठी त्यांच्या खिशात होती. पोलिसांनी ही सदरची चिठ्ठी पाहिली आणि त्यानंतर खलील शेखचा मृतदेह ससूनला पाठवण्यात आला. यानंतर काल संध्याकाळी खलील शेख याच्या पत्नीने केलेल्या तक्रारानुसार 14 जणांविरोधात फिर्याद नोंदवून घेण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिली होती. खलील शेख 2011 पासून पुण्यात बांधकामाचे कामे करत होता. तो आरोपींकडे सेंट्रिगचं काम करत होता. खलील शेखने या कामासाठी बाहेरुन व्याजाने पैसे उचलेल होते. आम्ही व्याजासहित पैसे दऊ, असे आश्वासन असे या सगळ्यांनी दिले होते. मात्र, यापैकी कोणीही पैसे न दिल्याने खलील तणावात होता. उत्कर्ष असोसिएट ही जी फर्म आहे, त्याठिकाणी रवींद्र धंगेकर यांची पत्नी, बाळा शेडगे, रघू गौडा यांची पत्नी भागीदार आहेत.
मृताची पत्नी सांगत होती, हे सगळे नावाला पार्टनर आहे, सगळा कारभार रवींद्र धंगेकर करतात. आता तपासात रोल काय होता, हे चेक करु. कोणाचं किती येणं आणि देणं येतं, हे तपासले जाईल. रवींद्र धंगेकर एका व्यक्तीकडे पैशासाठी खेटे मारत होता, पण कोणीही त्याचे पैसे देत नव्हते. खलील शेख याच्या पत्नीने सर्वांविरोधात 14 जणांविरोधात तक्रार नोंदवली आहे. खलील शेख याने चिठ्ठीत अडीच कोटी रुपयांचे येणे बाकी असल्याचे म्हटले आहे. हा गुन्हा गंभीर आहे. याप्रकरणात आम्ही योग्य ती कारवाई करु, असे स्वारगेट पोलिसांनी म्हटले होते.
Before You Go
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report





















