Sangram Thopte Full PC : संग्राम थोपटेंनी सोडली काँग्रेसची गादी, वाचून दाखवली कारणांची यादी
Sangram Thopte Full PC : संग्राम थोपटेंनी सोडली काँग्रेसची गादी, वाचून दाखवली कारणांची यादी
Sangram Thopate पुणे : राज्यातील काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. संग्राम थोपटे यांनी अखेर काँग्रेसला राजीनामा (Sangram Thopate Resignation to Congress) दिला आहे. शिवाय ते लवकरच भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. हा पक्ष प्रवेश करण्याच्या आधी थोपटे यांनी उद्या (20 एप्रिल ) काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून या बैठकीत ते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून ते आपली पुढील घोषणा करणार असल्याची शक्यता आहे. या बैठकीला तालुक्यातील सर्व समर्थक उपस्थित राहणार असल्याची ही चर्चा आहे. संग्राम थोपटे हे काँग्रेसचे बडे नेते असून ते तीन वेळा आमदार होते. तर त्यांचे वडील अनंतराव थोपटे हे सहा वेळा भोर विधानसभेचे आमदार होते. त्यामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळातील एक बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याने राज्यात हा काँग्रेसला मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
भाजपमध्ये प्रवेश करणार, उद्या करणार 'मन की बात'
काँग्रेसचे कट्टर समर्थक आणि भोर येथील मोठं राजकीय घराणं म्हणून थोपटे कुटुंबियांकडे बघितलं जातं. त्यातच संग्राम थोपटे हे काँग्रेसचे बडे नेते असून ते तीन वेळा आमदार होते. तर त्यांचे वडील अनंतराव थोपटे हे सहा वेळा भोर विधानसभेचे आमदार होते. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटे यांचा पराभव केला होता. अशातच संग्राम थोपटे हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असून ते पक्षाला राम-राम करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती.





















