Chandrakant Patil:चंद्रकांत पाटलांचं मुख्यमंत्र्यांनं पत्रअजित पवारांनी DPDCचा निधी रोखल्याची तक्रार
पुण्याचे पालकमंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील चांगलेच नाराज असल्याचं कळतंय. पुणे डीपीडीसीच्या कामांसाठी निधी अजित पवारांनी रोखल्यानं चंद्रकांत पाटलांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिल्याचं समजतंय. अजित पवार गड सत्तेत सहभागी होण्याआधी डीपीडीसीकडून विकासकामांसाठी साडे चारशे कोटींची मागणी करण्य़ात आली होती. मात्र त्यानंतर अजित पवार सत्तेत सहभागी झाले आणि अर्थमंत्रीही झाले. तेव्हा अजित पवारांच्या अर्थखात्य़ाकडून डीपीडीसीसाठी प्रस्तावित कऱण्यात आलेल्या 450 कोटींचा निधी थांबवण्यात आल्याची माहिती मिळतेय. यामुळे चंद्रकांत पाटील नाराज आहेत. कालही पुण्यातील बैठकीनंतर पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटलांनी पत्रकार परिषद घेणं अपेक्षित होतं. मात्र अजित पवारांनी थेट पत्रकार परिषद सुरू करून दिली. त्यामुळेही चंद्रकांत पाटील नाराज झाले, आणि बैठकस्थळावरून निघून गेले.