Prakash Surve on Sanjay Raut : एका आमदाराचं नाव सांगा, 25 हजारांचं बक्षीस देतो- प्रकाश सुर्वे
लोकसभेच्या निकालानंतर शिंदे गटातील काही नेत्यांच्या मनात चलबिचल सुरू आहे असं विधान संजय राऊतांनी केलंय. त्याला प्रकाश सुर्वेंनी आव्हानयुक्त उत्तर दिलं आहे. राऊतांनी एका आमदारांचं नाव सांगावं, मी त्यांना २५ हजारांचं बक्षीस देईन असं सुर्वे म्हणाले.
हे देखील वाचा
Beed News: बीडमध्ये पंकजा मुंडेंचा पराभव, जिल्ह्यात तणावाचं वातावरण; धनंजय मुंडेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणूक अत्यंत वेगळ्या वळणावर व अनेक मुद्द्यांनी गाजून पार पडली. अतिशय वेगळ्या वातावरणात झालेल्या या निवडणुकीत (Beed Lok Sabha Election 2024) झालेला पराजय आम्ही मोकळ्या मनाने स्वीकारला. विजयी उमेदवाराचे अभिनंदन सुद्धा केले. मात्र, अजूनही सोशल मीडियावर जातीवाचक व विविध नेत्यांची अवहेलना करणाऱ्या पोस्ट केल्या जात असून याद्वारे सामाजिक सलोखा बिघडून आपसातील द्वेष व तणाव वाढत आहे. त्यामुळे आपला सामाजिक सलोखा व सौहार्द जपण्याची जबाबदारी आता प्रत्येक बीड (Beed) जिल्हावासियाची आहे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आज व्हीडिओ संदेशद्वारे केले आहे.
'क्या हार मे, क्या जीत में, किंचित नही भयभीत मै' स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या या कवितेप्रमाणे मी व पंकजाताईंनी अत्यंत जिव्हारी लागणारा हा पराभव मान्य केला आहे. लोकशाहीमध्ये जनतेचा कौल हा महत्त्वाचा असतो आणि तो कौल आपण मान्य करून विजयी उमेदवारास शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत.