PM Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर, विकास कामांचं होणार उद्घाटन
PM Narendra Modi Mumbai Visit : पंतप्रधान मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर, विकास कामांचं होणार उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत त्यासाठी मुंबईत जय्यत तयारीही करण्यात आलीय. मुंबईच्या अंधेरी पूर्वेत मरोळ परिसरात बोरी मुस्लिम समाजाकडून उभारण्यात आलेल्या अल जामिया युनिव्हर्सिटीचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आलाय.. जानेवारी महिन्यातच मोदींनी मेट्रोसह विविध कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यासाठी मुंबईचा दौरा केला होता. त्यानंतर लगेच आता फेब्रुवारीत मोदी पुन्हा मुंबईंच्या दौऱ्यावर येणार पालिका निवडणुकांची चर्चा सुरु झाली आहे.

















