Chandrakant Patil : चंद्रकात पाटलांच्या वक्तव्यावर विरोधकांनी तीव्र शब्दात आक्षेप
राज्यात वादग्रस्त वक्तव्यांची मालिका काही केल्या थांबत नाहीये.... काल भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले आणि आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून आता घमासान सुरू आहे... महात्मा फुले आणि आंबेडकरांनी अनुदान न मागता भीक मागून शाळा सुरु केल्या, असं विधान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय... आणि त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांनी चंद्रकात पाटील यांच्यावर हल्लाबोल केलाय... चंद्रकात पाटलांच्या वक्तव्यावर विरोधकांनी तीव्र शब्दात आक्षेप घेतलाय... दरम्यान सत्ता गेली त्यामुळे सरकारला बदनाम करण्याचे कारस्थान असल्याचं सांगत चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय,...
















