एक्स्प्लोर

Emraan Hashmi Gunmaaster G9 Stunt SUV Flips Viral Video: इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता

Emraan Hashmi Gunmaaster G9 Stunt SUV Flips Viral Video: इमरान हाश्मीच्या 'गनमास्टर जी9' (Gunmaster G9) सिनेमाच्या सेटवरील एक 'बिहाईंड-द-सीन्स' (BTS) व्हिडीओ समोर आला आहे.

Emraan Hashmi Gunmaaster G9 Stunt SUV Flips Viral Video: 'आवारापन 2'च्या (Awarapan 2) यशानंतर, इमरान हाश्मी (Emraan Hashmi) सध्या त्याच्या पुढच्या सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. त्याचा आणखी एक रोमँटिक-ॲक्शन सिनेमा 'गनमास्टर जी9' (Gunmaster G9) नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार असून, यात त्याच्यासोबत जिनेलिया डिसूझा-देशमुख (Genelia D'Souza-Deshmukh) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा काही आठवड्यांतच प्रदर्शित होणार असतानाच, सध्या सिनेमाच्या सेटवरील एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत पडले आहेत. 

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी (Bollywood Actor Emraan Hashmi) याच्या अपघाताबाबतची बातमी समोर आली असून चाहत्यांना पुरता धक्का बसला आहे. एका व्हायरल व्हिडीओमुळे ही घटना समोर आली. एका सिनेमाच्या शुटिंगदरम्यान एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आणि दैव बलवत्तर म्हणूनच स्टार अभिनेता इमरान हाश्मी थोडक्यात वाचला असं बोललं जातंय. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये  त्याची एसयूव्ही (SUV) हवेत उलटली आणि एका व्हॅनवर जाऊन पडली. व्हिडीओ एवढा धक्कादायक आहे की, तो पाहताना काळजाचा ठोका चुकतो.  

विशेष म्हणजे, याच सिनेमासाठी एका धोकादायक स्टंटचा समावेश असलेले 'ॲक्शन सीन' शूट केले जात असताना ही घटना घडली. या शुटिंगची एक व्हिडीओ क्लिप समोर आली असून ती सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

इमरान हाश्मीच्या सिनेमाच्या सेटवर अपघात? (Emraan Hashmi Gunmaaster G9 Stunt Viral Video)

सोशल मीडियावर फिरणारा एक 'बिहाईंड-द-सीन्स' (BTS) व्हिडीओ इमरान हाश्मीच्या 'गनमास्टर जी9' (Gunmaster G9) सिनेमाशी संबंधित असल्याचं सांगितलं जातंय. या व्हिडीओमध्ये कारचा एक धोकादायक स्टंट पाहायला मिळतो, यात एक एसयूव्ही (SUV) हवेत उलटते आणि खाली उभ्या असलेल्या एका व्हॅनवर जाऊन आदळते. सिनेमाच्या सेटवरील या सीन्समध्ये एका मोकळ्या मैदानात कार स्टंटची तयारी सुरू असल्याचं दिसून येतं.

एका मोठ्या क्रेनच्या साहाय्यानं एक एसयूव्ही (SUV) हवेत अधांतरी लटकवलेली आहे. सिनेमाच्या निर्मिती पथकातील सदस्य आणि इतर लोक जवळच उभं राहून हा स्टंट पाहत आहेत. स्टंट सुरू होण्यापूर्वी 'काउंटडाऊन' केलं जातं. काउंटडाऊन संपताच, क्रेनला जोडलेली ती एसयूव्ही अचानक हवेतच उलट-पालट होऊ लागते. त्यानंतर ती गाडी गरगरत खाली येते आणि तिथे उभ्या असलेल्या एका काळ्या रंगाच्या व्हॅनवर जोरात जाऊन आदळते. हा सीन पाहून, बघणारे लोक आणि सिनेमाच्या निर्मिती पथकातील सदस्य त्या गाडीच्या दिशेनं धावताना दिसतात.

असा दावा केला जातोय की, या स्टंटच्या वेळी इमरान हाश्मी तिथे उपस्थित होता आणि ती गाडी त्याच्या चेहऱ्यापासून अगदी काही इंचांच्या अंतरावरून गेली, जर काही गडबड झाली असती, तर अभिनेत्याला गंभीर दुखापत झाली असती. मात्र, या व्हिडीओमध्ये इमरान दिसत नाही. त्यामुळे, हा स्टंट त्याच्या सिनेमाशीच संबंधित आहे, अशी खात्रीही कुणी अद्याप केलेली नाही. तसेच, 'गनमास्टर जी9' (Gunmaster G9) सिनेमाच्या निर्मात्यांनीही या प्रकरणाबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. इमरान हाश्मीच्या 'गनमास्टर जी9' सिनेमाबद्दल सांगायचं तर, हा सिनेमा 27 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. त्याच दिवशी सूरज बडजात्या दिग्दर्शित आयुष्मान खुरानाचा 'ये प्रेम मोल लिया' (Yeh Prem Mol Liya) सिनेमाही प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Abhijeet Dipke Post Sonakshi Sinha Comment: अभिजीत दिपकेंची आजीसाठी खास पोस्ट, डोळे पाणावणारं एका शब्दाचं कॅप्शन, सोनाक्षी सिन्हा कमेंट करुन म्हणाली...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunny Deol Suryaa Movie : सनी देओलच्या 'सूर्या' चित्रपटाच्या अडचणी वाढल्या, राजस्थान हायकोर्टाची केंद्र सरकार आणि सेन्सॉर बोर्डाला नोटीस; 3 दिवसात उत्तर देण्याचे आदेश
सनी देओलच्या 'सूर्या' चित्रपटाच्या अडचणी वाढल्या, राजस्थान हायकोर्टाची केंद्र सरकार आणि सेन्सॉर बोर्डाला नोटीस; 3 दिवसात उत्तर देण्याचे आदेश
Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Adinath Kothare Ramayana: 'रामायण'च्या शूटिंगदरम्यान आदिनाथ कोठारेला आला खास अनुभव, नेमकं काय घडलं? सांगितला सेटवरील किस्सा
'रामायण'च्या शूटिंगदरम्यान आदिनाथ कोठारेला आला खास अनुभव, नेमकं काय घडलं? सांगितला सेटवरील किस्सा
Mahesh Limaye On Salman Khan: 'सलमान खान T-Shirt खात सिनेमा बघत होते'; प्रवीण तरडेंचा 'मुळशी पॅटर्न' पाहिल्यानंतर भाईजानची पहिली प्रतिक्रिया काय होती?
'सलमान खान T-Shirt खात सिनेमा बघत होते'; प्रवीण तरडेंचा 'मुळशी पॅटर्न' पाहिल्यानंतर भाईजानची पहिली प्रतिक्रिया काय होती?
Advertisement

व्हिडीओ

Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Jat Case : गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
Suryakumar Yadav : मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Maha Pulse AI Project : शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
Embed widget