एक्स्प्लोर
Narayan Ran on Raj Uddhav Thackeray : एकोपा राज-उद्धव ठाकरेंचा, प्रहार नारायण राणेंचा
नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे यांनीच राज ठाकरे यांना छळले आणि शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी प्रवृत्त केले, असा दावा राणे यांनी केला आहे. राज ठाकरेच नव्हे, तर एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांनीही ठाकरेंना कंटाळूनच शिवसेना सोडल्याचे नारायण राणे यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून म्हटले आहे. "जो बोन से गया वो हॉट से नहीं आता," असे म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे आता राज ठाकरे यांना भाऊबंदकीच्या नात्याने परत येण्यास सांगून प्रयत्न करत आहेत. मला आठवते, उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना छळले होते आणि त्रासही दिला होता. पक्षाबाहेर जायला त्यांनीच प्रवृत्त केले होते, याची त्यांना जाणीव नाही असे वाटते आणि आता का म्हणून लाड ओकत आहेत, असे राणे म्हणाले. राज ठाकरे, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिले. त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसवले. उद्धव ठाकरे यांनी ती सत्ता घालवली. शिवसेनेच्या अधोगतीला पूर्णपणे उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, असे नारायण राणे यांनी स्पष्ट केले.
राजकारण
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
Mohite-Patil Dhairyasheel Rajsinh : घायल हूं इसलिए घातक है...विजयानंतर धैर्यशील मोहिते पाटलांची डायलॉगबाजी
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही
Bhagyashree Jagtap Lonavala : फळविक्रेती भाग्यश्री काल नगरसेवक बनल्या, आज पुन्हा फळगाडा लावून सेवेत
आणखी पाहा



















