Mahayuti PC : Devendra Fadanvis : मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, हिंदी भाषा शासन निर्णय निर्णय रद्द!
Mahayuti PC : Devendra Fadanvis : मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, हिंदी भाषा शासन निर्णय निर्णय रद्द!
Mumbai: राज्यभरात हिंदी सक्तीवरून आणि त्रिभाषा सुत्रावरून वाद उफाळलेला असताना हिंदी सक्ती बाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात आले आहेत . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हिंदी सक्ती बाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 हे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत सांगितलं . यासाठी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात एक नव्याने समिती तयार करण्यात येईल . त्रिभाषा सूत्रसंदर्भातील सगळं सूत्र माशेलकर समिती अभ्यासेल .त्यानंतर विद्यार्थ्यांच्या हिताचं जे असेल ते सूत्र राज्य सरकार स्वीकारेल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले . आमच्याकरता मराठी आणि मराठी विद्यार्थी महत्त्वाचा .आमची नीतीही विद्यार्थी केंद्रित असेल .यात आम्हाला कोणत्याही प्रकारचा राजकारण करायचं नाही . असेही त्यांनी सांगितले .
देवेंद्र फडणवीसकाय म्हणाले?
आजच्या अधिवेशनाच्या या पूर्वसंध्येला आम्ही विरोधी पक्षाला चहापानासाठी बोलवलं होतं. परंतु नेहमीच्या पद्धतीने विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार टाकला आहे. हा बहिष्कार टाकताना त्यांनी एक भलं मोठं पत्र दिलं आहे. पत्र मोठा असला तरी मजकूर फार नाही .मागच्या पत्रातीलच मुद्दे मोठ्या अक्षरात दिले आहेत .एक दोन नवीन विषय आहेत . मराठीचा विषय अत्यंत महत्त्वाचा असल्याने विरोधकांच्या पत्रामध्ये व्याकरणाच्या 24 चुका आहेत . आजच्या पत्रावर भास्कर जाधव यांचे सही दिसत नाही . सह्यांमध्ये पाच तीन दोन झालं वडेट्टीवार आज पत्रकार परिषदेत असं म्हणाले की आमच्या कामांना स्थगिती मिळाली .त्यांना अजूनही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत असं वाटतंय .




















