फक्त एका माणसाला उत्तर द्यायचंय... राम सातपुते यांना थेट इशारा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDhairyashil Mohite Patil, Akluj : "एका गावात मला तरुण पोरांनी सांगितलं. निवडणुकीला उभा राहणार असाल तर गावात यायचं. नाहीतर वापस जावा. करमाळा तालुक्यातील गाव होतं. त्यानंतर जाईल तिथे असंच सुरु झालं. मी रोज मोठ्या दादांना येऊन सांगत होतो. त्यानंतर लोकांनी वेदना सांगण्यास सुरुवात केली. पाण्याची परिस्थिती काय आहे हे सांगितलं. त्यादिवशी ठरवले की माझ्यासाठी नाही तर लोकासाठी उभं राहायचं. घरचा कारभारी नीट असला तर घर नीट चालतं. माढा मतदारसंघातील लोकांना चांगला कारभारी पाहिजे. चांगला कारभार करण्यासाठी सहकार महर्षीनींही शिकवण दिली आणि मोठ्या दादांनीही दिली. जनतेची कामं कशी करायची आणि वेळ कसा द्यायचा, हे शिकवलंय", असं धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyashil Mohite Patil) म्हणाले. अकलूजमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar), प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटीलही उपस्थित होते.