Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलोकसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीतल्या नेत्यांच्या टार्गेटवर आहेत. अर्थसंकल्प मांडल्यानंतर विरोधकांनीही त्यांच्यावर टीकेची झोड उठवलीय. त्यामुळे विरोधकांना उत्तर देण्यासाठी अजितदादांनी व्हि़डिओतून संदेश दिला...यावर राष्ट्रवादी पक्षापासून भ्रष्टाचारापर्यंत अनेक मुद्द्यांवर अजितदादा व्यक्त झालेत. पाहुुयात याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट...
काका शरद पवारांविरोधात बंड करून अजितदादांनी महायुतीचा झेंडा हाती घेऊन वर्षं झालं...
या वर्षभरात बरंच काही झालं...राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह त्यांना मिळालं...
उपमुख्यमंत्रिपद मिळालं...आणि लोकसभेत दादांच्या पक्षाचा दारुण पराभवही झाला...
पण अजित पवार म्हणतात पक्ष बदललाच नाही...
आगामी विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवत अजितदादांनी नुकत्याच मांडलेल्या बजेटमध्ये अनेक लोकप्रिय घोषणा केल्यात...
बजेटमध्ये आश्वासनांचा पाऊस असला तरी ते विरोधकांच्या टीकेचे धनीसुद्धा बनलेत...
त्यामुळे व्यथित झालेल्या अजितदादांनी टीकाकारांना उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ संदेश जारी केलाय...