Johson and Johnson : बेबी पावडरच्या उत्पादन, विक्रीच्या परवान्यावर बंदी घालण्याच्या निर्णयाला आव्हान

Continues below advertisement

हायकोर्टात धाव घेतलीय. जॉन्सन बेबी पावडरचा उत्पादन आणि विक्री परवाना रद्द करण्याच्या एफडीएच्या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्यात आलंय. हायकोर्टाने या प्रकरणाची सुनावणी ९ नोव्हेंबरपर्यंत स्थगित केलीय. कंपनीला बंदीची शिफारस करणारा अहवाल उपलब्ध करून देण्याचे निर्देश  कोर्टाने दिले आहेत. जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर या लोकप्रिय उत्पादनात प्रमाणाबाहेर असलेले जीवाणू कमी करण्यासाठी कॅन्सरपूरक अशी निर्जंतुकीकरण प्रक्रिया केल्याच्या आरोप एफडीएने केला होता. त्यामुळे एफ़डीएने जॉन्सन अँड जॉन्सनच्या सर्वच्या सर्व प्रसाधनांचा उत्पादन परवाना रद्द केला. एफडीएचा हा निर्णय अन्यायकारक आहे, असा दावा कंपनीनं केला आहे. कंपनीच्या मुलुंड इथल्या प्रकल्पामध्ये बेबी पावडरच्या उत्पादन आणि विक्रीला मुभा देण्याची मागणी कंपनीनेे केली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram