Avadiche Khane rajkiy Tanebane Kangana Ranaut : घराणेशाहीवरुन काँग्रेसवर हल्ला, कंगना रनौत Exclusive
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAvadiche Khane rajkiy Tanebane Kangana Ranaut : घराणेशाहीवरुन काँग्रेसवर हल्ला, कंगना रनौत Exclusive
बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) ही मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपची (BJP) उमेदवार आहे. तिला भाजपने तिची जन्मभूमी असलेल्या हिमाचल प्रदेशातूनच उमेदवारी दिली आहे. सध्या कंगना ही तिच्या निवडणुकांचा प्रचार जोरदार करतेय. त्यामुळे ती ही निवडणूक जिंकणार असल्याचा विश्वास अनेकांकडून व्यक्त केला जातोय. पण याच दरम्यान कंगनाने देखील एक मोठी घोषणा केली आहे. कंगना निवडणूक जिंकली तर ती काय करणार असा प्रचार कंगनाच्या विरोधात असलेल्या काँग्रेसच्या उमेदवारांकडून करण्यात येतोय. एकुणच आपल्यावर होणाऱ्या सर्व टीकांना उत्तर कंगना रनौतने विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच राजकीय घराणेशाही आणि बॉलीवूडमधली परिस्थितीवर कंगना रनौतने परखडपणे मत व्यक्त केलंय.