Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 26 June 2024 ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 26 June 2024 ABP Majha
उद्यापासून सुरू होणारं अधिवेशन हे महायुती सरकारच्या निरोपाचं अधिवेशन, उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं उकरून काढा, केंद्रीय नेतृत्वाच्या राज्यातल्या काँग्रेस नेत्यांना सूचना, मोठा भाऊ छोटा भाऊ वादात पडू नका, दिल्लीतल्या नेत्यांचा सल्ला
राहुल गांधी १३ किंवा १४ जुलै रोजी आषाढी वारीत सहभागी होण्याची शक्यता, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अप्रत्यक्ष प्रचाराची काँग्रेसची रणनीती
मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय महाविकास आघाडी विधानसभा लढणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती, तर निकालानंतर मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय
मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतदान, मतदान केंद्रांवर रांगा, महायुती आणि मविआची रस्सीखेच
ठाकरे गटाच्या सर्व आमदारांची आज रात्री ८ वाजता वांद्रेतील ताज लँड हॉटेलमध्ये बैठक, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखणार