(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar on BJP : आजारी असताना मुक्ता टीळक, लक्ष्मण जगतापांना मतदानाला का बोलावलं?
Ajit Pawar on BJP : आजारी असताना मुक्ता टीळक, लक्ष्मण जगतापांना मतदानाला का बोलावलं?
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जिंकून आणण्यासाठी आता अजित पवारांनीच जोर लावल्याचं दिसून येतंय... आज महाविकास आघाडीची सभा पिंपरी चिंचवडमध्ये झाली... राष्ट्रवादीकडून नाना काटे तर भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी मिळालीय... आजच्या महाविकास आघाडीच्या सभेत अजित पवारांनी बंडखोरीचा बदला घ्यायचा आहे म्हणत शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला, तर बाळासाहेबांनीच युवकांची जबाबदारी आदित्य ठाकरे यांच्याकडे दिली असेल तर आक्षेप घेणारे तुम्ही कोण असं म्हणती शिंदे गटावर निशाणा साधला... याशिवाय कसब्याच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे आजारी असताना भाजपनं स्वार्थीपणा केला... राज्यसभेच्या निवडणुकीच्या दोन मतांसाठी आजारी असताना या दोन्ही आमदारांना भाजपनं मुंबईला का बोलावलं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.