Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राची धाकधूक वाढली, फैसला कुणाच्या बाजूने याकडे लक्ष
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचाआज निकाल लागणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरणार की शिंदे सरकार कायम राहणार हे स्पष्ट होणार आहे. पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ या प्रकरणावर निकाल देणार आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड (CJI D Y Chandrachud) हा निकाल वाचून दाखवणार आहेत.
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक निर्णायक केस म्हणून या केसचं महत्व कायम राहिल. सत्तासंघर्षाच्या कायदेशीर लढाईत 14 फेब्रुवारी ते 16 मार्च अशी मॅरेथॉन सुनावणी झाली. जून 2022 मध्ये प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं, पण त्यावर 8 महिन्यांनी सुनावणी सुरु झाली. ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त कामत तर शिंदे गटाच्या वतीनं हरीश साळवे, नीरज किशन कौल, महेश जेठमलानी, मणिंदर सिंह, राज्यपालांच्या वतीनं तुषार मेहता यांनी युक्तिवाद केले. आज घटनापीठ त्यावर निकाल देणार आहे.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
