एक्स्प्लोर
Palghar Protest : पालघरमधील बंदर विरोधी संघर्ष समितीचं मुंबईत आंदोलन, ठाकरे गटाचाही पाठिंबा
पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदराविरोधात आज स्थानिक नागरिक मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढणार आहेत. प्रस्तावित वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध आहे. हा विरोध तीव्र करण्यासाठी वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीनं आज मोर्चाचं आयोजन केलंय. केंद्र आणि राज्य सरकारविरोधातील या आंदोलनासाठी डहाणू, पालघर भागातील शेकडो कार्यकर्ते रेल्वे लोकलमधून सकाळीच मुंबईकडे रवाना झालेत. सुमारे २५ हजार कार्यकर्ते या मोर्चाला उपस्थित राहतील अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी दिलीय. या आंदोलनाला शिवसेनेच्या ठाकरे गटानेही पाठिंबा दिलाय
आणखी पाहा























