मास्क नसल्यास बेस्ट, टॅक्सी, रिक्षामध्ये प्रवेश मिळणार नाही, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय
Continues below advertisement
‘कोविड-19’ या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेद्वारे करण्यात येत असलेल्या विविध स्तरीय कार्यवाही अंतर्गत ‘विना मास्क’ विषयक जनजागृती करतानाच दंडात्मक कारवाई अधिक तीव्र करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी महापालिकेच्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीदरम्यान दिले आहेत. या अंतर्गत बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व कार्यालये, आस्थापना, मॉल्स, सोसायटी, सभागृह इत्यादी ठिकाणी ‘मास्क नाही, प्रवेश नाही’; ‘नो मास्क, नो एन्ट्री’ अशा आशयाचे फलक लावण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर सर्व बसेस, टॅक्सी, रिक्षा इत्यादींवर देखील याच आशयाचे स्टीकर्स लावण्याचे निर्देश देण्यात आले असून, या आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देशही महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
Continues below advertisement