Rohit Sharma Meet Family at Wankhede : विश्वविजेत्या लेकाला जेव्हा आईबाप भेटले, रोहितची मायेची भेट

Continues below advertisement

मुंबई : टी-20 विश्वचषकावर (T-20 World Cup) आपलं नाव कोरून, टीम इंडिया भारतात परतली आहे. मातृभूमीत आल्यानंर भारतीय संघाचं जोरदार स्वागत करण्यात आलंय. या संघाच्या कौतुकासाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खास अभिनंदनपर कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या विजयासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक खेळाडूला भारतीय जनतेकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या कुटुंबापासून दूर राहून हे खेळाडू भारताला जेतेपद मिळवून देण्यासाठी जिवाचं रान करत होते. दरम्यान, आता रोहित शर्माचा आपल्या कुटुंबीयांसोबतचा एक खास क्षण सध्या व्हायरल होत आहे. आपल्या मुलाला पाहून रोहितची आई भावूक झाली आहे. 

रोहितला मायेने घेतले जवळ

टीम इंडिया मुंबईत आल्यानंतर त्यांचे ढोल-ताशाच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. वानखेडे स्टेडियम ते मरीन ड्राईव्ह इंडिया या परिसरात लाखो लोकांनी टीम इंडियासाठी  गर्दी केली होती. दरम्यान, हा सोहळा पार पडल्यानंतर रोहितने आपल्या कुटुंबियांची भेट घेतली. रोहित आपल्या आईकडे गेला. पूर्णिमा शर्मा (Purnima Sharma) म्हणजेच रोहितच्या (Rohit Sharma) आईदेखील आपल्या मुलाला पाहून भावुक झाल्या. त्यांनी रोहितला मायेने जवळ घेतले आणि प्रेमाने रोहितची पप्पी घेतली. आपल्या आईला पाहून रोहितही काही क्षणासाठी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, या व्हिडीओची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. लोक या व्हिडीओला भरभरून लाईक करत आहेत. आई-मुलाच्या या निखळ प्रेमाने समस्त भारतीय भारावून गेले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram