Rohit Sharma Marathi Reaction: मी खूप खूश महामिरवणुकीनंतर रोहित शर्माची मराठीतून प्रतिक्रिया

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...

Rohit Sharma : वानखेडे स्टेडियमवर आज विश्वविजेत्या टीम इंडियाचा गौरव करण्यात आला. यावेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने हार्दिक पांड्याचे तोंडभरुन कौतुक केले. त्याशिवाय ही ट्रॉफी फक्त टीम इंडियाची नाही, तर सगळ्या देशाची आहे, असेही रोहित शर्मा म्हणाला. रोहित शर्माने वानखेडे स्टेडियमवर हजारो चाहत्यांसोबत केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे. मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विश्वविजेत्या टीम इंडियाची ओपन डेक बसमधून विजयी मिरवणूक झाली. त्यानंतर वानखेडेवर जय शाह यांनी 125 कोटींचा चेक सुपूर्द केला. यावेळी रोहित शर्मा, विराट कोहली, राहुल द्रविड यांनी आपलं मनोगत व्यक्त केले. 

रोहित शर्माने वानखेडेवर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याचं कौतुक केले. हार्दिक पांड्याने टाकलेलं षटक निर्णायक होते,सूर्यकुमार यादवनेही भन्नाट झेल घेतला, असे रोहित शर्मा म्हणाला.   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola