Raj Thackeray Full Speech : खोके खोके करणाऱ्यांकडे कंटेनर, उद्धव ठाकरेंवर थेट हल्लाबोल ABP Majha
Raj Thackeray Full Speech : खोके खोके करणाऱ्यांकडे कंटेनर, उद्धव ठाकरेंवर थेट हल्लाबोल ABP Majha पनवेल : "चंद्रयान चंद्रावर जाऊन काय उपयोग, तिथे जाऊन खड्डेच बघायचे आहेत, त्यापेक्षा महाराष्ट्र सोडलं असतं तर खर्चही वाचला असता," असा खोचक टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबई-गोवा महामार्ग, तसंच नाशिकमधील रस्त्यांच्या अवस्थेवरुन लगावला आहे. पनवेल इथल्या कोकणातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप, राष्ट्रवादी, ठाकरे गटावर जोरदा शरसंधान साधलं. भाजपने दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायचंही शिकावं, असा हल्लाबोल त्यांनी केला. तर खोके खोके ओरडणाऱ्यांकडे कंटेनर आहेत, असं राज ठाकरे म्हणाले. मुंबई-गोवा महामार्गप्रश्नी आता मनसे आक्रमक झाली आहे. गणपतीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी आता मनसे मैदानात उतरली आहे. या मेळाव्यात प्रलंबित मुंबई-गोवा महामार्गा संदर्भात आंदोलनाची हाक देण्यात आली. मेळाव्यात राज ठाकरे म्हणाले की, "शिवसेना भाजपा नंतर काँग्रेस-राष्ट्रवादी आली, आता तर सगळेच आले कळत नाही कोण आले. पण लोकांना तुम्ही कसे काय यांना मतदान करतात? आम्ही खड्यातून गेलो काय किंवा खड्यात गेलो काय? महाराष्ट्रातील लोकांना कधीच वाटत नाही का, यांना एकदा धडा शिकवायला हवा, नुसती आश्वासनं देतात."