एक्स्प्लोर
Nashik : खरशेतच्या सावरपाडामधील आदिवासी महिलांची जीवघेणी कसरत संपली, सरकारने घेतली दखल
बातमी एबीपी माझाच्या इम्पॅक्टची, त्र्यंबकेश्वरच्या खरशेतच्या सावरपाडामधील आदिवासी महिलांची जीवघेणी कसरत आता संपलीय.... खरशेत येथील आदिवासी महिलांना हंडाभर पाण्यासाठी 30 फूट खोल नदीवरुन जीवघेणी कसरत करावी लागत होती. याबाबतच वृत्त एबीपी माझानं दाखवलं आणि त्यानंतर या ठिकाणी दोन दिवसांत या नदीवर लोखंडी पूल बसवण्यात आलाय. त्यामुळे स्थानिक आदिवासी महिलांना दिलासा मिळालाय... तसंच या पुलामुळे पिढ्या न् पिढ्या होणारी जीवघेणी कसरत आता दूर झालीय... मात्र पूल आला तरी हंडाभर पाण्यासाठीची पायपीट कधी संपणार? या भागातील घराघरात पाईपलाईन कधी पोहोचणार असा सवाल उपस्थित करण्यात येतोय.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















