Nashik Rain Update : नाशिकमध्ये रात्री मुसळधार पाऊस, रस्त्यांना नदीचं स्वरूप
Nashik Rain Update : नाशिकमध्ये रात्री मुसळधार पाऊस, रस्त्यांना नदीचं स्वरूप
नाशिकची गोदावरी नदी सलग 13 व्या दिवशी ही प्रवाहित असल्याचा आपल्याला बघायला मिळत आहे. 19 जूनला नाशिक शहर परिसरामध्ये मुसलधार परजन्यवृष्टी झालेली होती. त्रंबकेश्वर तालुक्यामध्ये देखील तशीच परिस्थिती होती त्यामुळे गोदावरी नदीमधन पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात आला होता. जून महिन्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये गोदावरी नदीला पूरदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. विसर्गही वाढवण्यात आलेला होता. मात्र टप्प्या टप्प्याने विसर्ग कमी केला तरी देखील आज पहाटेपासून नाशिक शहर आणि त्रंबकेश्वर परिसरामध्ये पुन्हा एकदा भुसा. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता ही व्यक्त केली जाते. सध्या गंगापूर धरणामधन 1360 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र धरणाच्या पांडलोड क्षेत्रामध्ये होणाऱ्या सातत्याच्या पावसामुळे धरणामधला विसर्ग हा वाढला जाऊ शकतो. सध्या आपण आता अहिल्याबाई होळकर पुलावर आहोत इथून 1800 कसेक वेगाने पाण्याचा विसर्ग हा रामकुंडाच्या दिशेने जातोय जर वरून पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात आला तर इथला विसर्ग देखील वाढेल आणि गोदा मंदिर पुन्हा एकदा पाण्याने वेढली जाईल अशी परिस्थिती आहे. आता सद्य परिस्थितीमध्ये आजूबाजूचे रस्ते आणि छोटे पुल यांना पाणी लागलेल आहे परंतु पाण्याचा विसर्ग जर वाढला तर हे सर्व पुल आणि आजूबाजूचे मंदिर ही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. दूतोंड्या मारुती त्याच्या आता चरणाला पाण्याने स्पर्श केलेला आहे परंतु जर गोदावरीच्या पाण्याची पातळी वाढली तर दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी जाण्याचा देखील शक्यता व्यक्त केली जाते सध्या. पूर्णपणे नियंत्रणामध्ये आहेत, इथले धार्मिक विधी जे आहेत ते परंपरेप्रमाणे आहे त्या ठिकाणी होत आहेत, परंतु जर पावसाचा जोर वाढला, जर धरणाच्या पांडलो क्षेत्रामधला पाऊस वाढला आणि धरणामधन पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ आली तर मात्र इथले धार्मिक विधी इतरत्र हलवले जाऊ शकतात आणि गोदावरीची पाण्याची पातळी आणखी वाढेल






















