(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Water Issue : हंडाभर पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष, Igatpuri च्या खैरेवाडीत पाण्याचं दुर्भिक्ष
अमरावीच्या मेळघाटमधील गावातील आदिवासी बांधवांचा पाण्यासाठीचा संघर्ष आपण पाहिला. असंच काहीसं चित्र . नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पाड्यात वर्षानुवर्षे पाहायला मिळतंय. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील खैरेवाडी गावात पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष आहे. तीन ते साडेतीन किलोमीटर पायपीट करुन ग्रामस्थ विहिरीवर पोहोचतात. मात्र पाणी ग्रामस्थांपैकी एकाला तीस ते पस्तीस फूट विहिरीत उतरावं लागतं. मात्र त्यानंतरही विहिरीतील गाळमिश्रित पाण्यावरच या ग्रामस्थांना तहान भागवावी लागते. गेल्या अनेक वर्षांपासून सकाळ, संध्याकाळ खैरेवाडी ग्रामस्थांचा पाण्यासाठी हा जीवघेणा संघर्ष सुरु आहे. हंडाभर पाण्यासाठी या ग्रामस्थांवना लेकरा बाळांसह पायपीट करावी लागतेय. मात्र अनेक वर्षांनंतरही पाण्यासाठीची खैरेवाडीतील ग्रामस्थांची पायपीट संपत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर स्थानिकांकडून संताप व्यक्त होतोय...