Nashik Chandwad Truck Accident : नाशिकच्या चांदवडमध्ये ट्रक अपघात, अडकलेल्या चालकाची लोकांकडून सुटका
Nashik Chandwad Truck Accident : नाशिकच्या चांदवडमध्ये ट्रक अपघात, अडकलेल्या चालकाची लोकांकडून सुटका
नाशिकच्या चांदवड येथील मुंबई महामार्गावरून मालेगावच्या दिशेने जात असलेला रद्दीचा ट्रक राहुड घाटात ब्रेक फेल होवून पलटी झाला..गाडीचा वेग जास्त असल्याने ट्रक बाजूच्या सिमेंटच्या भिंतीवर जावून ५ ते ७ मीटर घसरत जावून आदळला..या अपघातात चालक व वाहक ट्रक मध्येच अडकल्याने नागरीकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढत त्यांना चांदवड येथे शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले..ट्रक पलटी झाल्याने ट्रकमधील सर्व रद्दी रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतुकीला खोळंबा झाला होता.. दरम्यान, महामार्गावरील या वळणावर नेहमीच अपघात घडत असल्याने याठिकाणी उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.























