Territories Nashik : नाशिकमध्ये एटीएसची मोठी कारवाई, इसिसला पैसे पाठवल्याप्रकरणी अटक : ABP Majha
नाशिकमध्ये दहशतवादी संघटनांशी संबंधित एका आरोपीला एटीएसने ताब्यात घेतलंय.. भारतात बंदी असलेल्या दहशतवादी संघटनांना फंडिंग केल्याप्रकरणी एटीएसने ही कारवाई केलीय. हुजेफ अब्दुल अजीज शेख असं आरोपीचं नाव असून त्याची अनेक खासगी कंपन्यांमध्ये भागीदार असल्याची माहिती एटीएसकडून मिळालेय. तर आरोपी इसिसशी संबंधित सीरियामध्ये राहणारी महिला रबिया उर्फ उम ओसामाला पैसे पाठवत असल्याची माहितीही एटीएसकडून मिळालीय. त्याच्या घराची झाडाझडती घेतल्यावर ७ मोबाईल फोन्स, एक लॅपटॉप आणि पेन ड्राइव्ह हस्तगत करण्य़ात आलं आहे. त्याच्यावर यूएपीए कायद्याअंतर्गत गंभीर कलमं लावण्यात आली आहे. कोर्टानं त्याला ३१ जानेवारीपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे






















