(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik APMC Elections : मतदारांची 5 स्टार हॉटेलात सोय, विरोधकांकडून चौकशीची मागणी
Nashik APMC Elections : मतदारांची 5 स्टार हॉटेलात सोय, विरोधकांकडून चौकशीची मागणी
मुंबई महामार्गावर असलेल्या एक्सप्रेस ईन या पंचतारांकित हॉटेलमध्ये नेहमी परदेशी पाहुणे, मोठे राजकीय नेते, नामांकित उद्योजक यांचा वावर बघायला मिळतो मात्र काल सकाळी ईथे एक वेगळंच चित्र बघायला मिळाले. या हॉटेलमधून सकाळी चक्क आदिवासी पाड्यावरील तसेच ग्रामीण भागातील नागरिक बाहेर पडले. ही सगळी जवळपास तिनशे मंडळी या हॉटेलमध्ये मुक्कामी होती आणि यामागे निमित्त होतं ते नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचं. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपलं पॅनल आणि शेतकरी विकास पॅनलमध्ये थेट लढत होते आहे. आपलं पॅनलचे देविदास पिंगळे आणि शेतकरी विकास पॅनलचे शिवाजी चुंबळे हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक आहेत. विशेष म्हणजे देविदास पिंगळे यांच्या गुंडगिरीला वैतागून ही सर्व आदिवासी मंडळी शेतकरी विकास पॅनलला मतदान करण्यासाठी स्वतःहून पंचतारांकित हॉटेलमध्ये येऊन थांबल्याचा अजब दावा शेतकरी विकास पॅनलच्या नेत्यांनी केलाय.
दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी प्रतिस्पर्धी उमेदवार आणि आपलं पॅनलच्या देविदास पिंगळे यांनी केलीये.