Nashik Accident : पतंग उडवताना शाॅक लागून 15 वर्षाच्या मुलाचा जीव गेला
Nashik Accident : पतंग उडवताना शाॅक लागून 15 वर्षाच्या मुलाचा जीव गेला मकर संक्रात सणाच्या पूर्वसंध्येलाच नाशिकमध्ये एक दुःखद घटना समोर आली आहे. विजेच्या तारांवरील अडकलेली पतंग काढायला गेलेल्या एका 15 वर्षीय मुलाचा विजेच्या जोरदार झटक्याने मृत्यू झाला आहे. भाग्येश विजय वाघ असे मयत मुलाचे नाव असून तो दहावी इयत्तेत शिक्षण घेत होता. आज (रविवार) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील साई राम रो हाऊस जवळ काही मुलं खेळत होती याचवेळी विजेच्या तारांवर अडकलेली पतंग काढण्यासाठी भाग्येशने एका स्टीलच्या रॉडचा आधार घेताच त्याला विजेचा जोरदार झटका बसला. परिसरातील नागरिकांनी तात्काळ उपचारासाठी त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले त्यानंतर वडिलांनी जिल्हा शासकीय रुग्णालयातही त्याला नेले मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. भाग्येश हा इयत्ता दहावीत शिकत होता, त्याच्या पश्यात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे.