Hospital Fire Safety : नाशिकच्या बिटको रुग्णलायाची आदर्श सुरक्षा यंत्रणा, ABP माझाचा सेफ्टी चेक
अहमदनगरच्या घटनेनंतर रुग्णलयाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय, रुग्णलायला बांधताना रुग्णलाय प्रशस्त, हवा खेळती असावी एका बाजूला आग लागली तर दुसऱ्या बाजूने जाण्यासाठी पर्यायी मार्ग असावा, प्रत्येक मजल्यावर प्रत्येयक वार्ड मध्ये अग्नी प्रतिबंधक युनिट असावे, इलेक्ट्रिक आणि फायर ऑडीट वेळोवेळी करणे बंधनकारक असल्याचं तज्ञ सांगत आहेत. नाशिकचे बिटको रुग्णलाय नुकतेच बांधण्यात आले, रुग्णलायच्या प्रत्येक मजल्यावर प्रत्येक कक्षात अग्नी प्रतिबंधक पाईपलाईन बसविण्यात आलीय, रुग्णलायात कुठेही शॉर्ट सर्किट झाले किंवा धूर निघायला लागला तर स्मोक डिटेक्टर बसविण्यात आलेत, ते अलार्म सिसिटीम ला जोडण्यात आले आहेत यावरुन आग कुठे लागली किंवा धूर कुठून निघतोय याची माहिती मिळते त्यामुळे घटनास्थळी धाव घेऊन पुढील उपाययोजना करता येईल येतात त्याच बरोबर स्प्रिंकल बसविण्यात आले आहे धूर किंवा आगीमुळे त्याचे तपमान वाढल्यास ते फुटते आणि 360 अंशतः पाण्याची फवारणी केली जाते.























