Nashik | मंदिरात प्रवेश बंदी फक्त सर्वसामान्यांनाच का? नाशकात मंत्री जितेंद्र आव्हाडांकडून पूजा
जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा नाहीतर सर्वसामान्य जनतेसाठी उद्यापासून मंदिरं खुली करा अशी मागणी भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी केली असून महाराष्ट्रात सध्या हा चर्चेचा विषय ठरतोय. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी दुपारी नाशिकच्या प्रसिद्ध श्री नवश्या गणपती मंदिरात हजेरी लावली आणि चक्क गाभाऱ्यातच जाऊन गणपती बाप्पाची विधिवत पूजाअर्चा करत आरती केली. आव्हाड यांचे कार्यकर्ते, मंदिर संस्थानचे अध्यक्षही त्यांच्यासोबत यावेळी उपस्थित होते. मंदिराबाहेर पडताच आव्हाड यांचा मंदिर प्रशासनाकडून पुष्पगुच्छ देत सत्कारही पार पडला. याबाबत मंदिर संस्थानला विचारणा केली असता 'दुपारच्या आरतीसाठी साहेब आले होते' अस त्यांनी म्हंटलय. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यात सध्या प्रशासनाकडून विकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय मात्र दुसरीकडे रविवारीच मंत्री महोदयांसाठी मंदिराची द्वारे उघडण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातय.