Ashok Kharat Case Update : अशोक खरातच्या घराबाहेरुन मोठी घडामोड, मुलाला केली SIT न ताब्यात घेतलं
नाशिक : भोंदू अशोक खरातच्या पत्नीची चौकशी करायला गेलेल्या नाशिक पोलिसांनी अशोक खरातच्या (Ashok Kharat) मुलाला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी जलदगतीने हालचाली करत ही कारवाई केली आहे. अशोक खरातची पत्नी कल्पना खरातवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्यानंतर ती फरार झाल्याची माहिती समोर आली. आता पोलिसांनी अशोक खरातच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली.
अशोक खरातसोबत त्याची पत्नी कल्पना खरातवर शिर्डी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर नाशिक पोलीस कल्पना खरातची चौकशी करण्यासाठी खरातच्या निवासस्थानी गेले. मात्र, कल्पना खरात आधीच फरार झाल्याची माहिती समोर आली. दरम्यान, यावेळी घरात असलेल्या अशोक खरातच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. तर कल्पना खरातच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथकं नाशिक आणि शिर्डीच्या दिशेने रवाना झाली आहेत.





















