एक्स्प्लोर
Nandurbar : ढगाळ वातावरण आणि पावसामुळे नंदुरबार बाजार समितीत गव्हाची आवक वाढली
नंदुरबार बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात गव्हाची आवक होत असल्याचं पाहायला मिळतंय.. हवामान खात्याने काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त केल्यानंतर शेतकरी मोठ्या प्रमाणात गहू बाजार समितीत विक्रीसाठी आणत असल्याचं दिसून येतंय. नंदुरबार बाजार समितीमध्ये आता दररोज 2,500 ते 2,700 क्विंटल गव्हाची आवक होत आहे. अगोदर 1000 ते तेराशे क्विंटल गव्हाची आवक होती... मात्र ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने गव्हाची आवक वाढल्याचं पाहायला मिळतंय..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग























