Nagpur : समृद्धी महामार्गावर 'झीरो माईल स्क्वेअर', PM Modi यांच्या हस्ते होणार लोकार्पण
आपल्या शहरात किंवा गावात आपण लहान-मोठे चौक नेहमीच पाहतो... मात्र राज्यातला सर्वात मोठा चौक तुम्ही पाहिला आहे का?? तब्बल 18 एकर क्षेत्रात विस्तारलेला आणि सुमारे 1 किलोमीटरची परिक्रमा असलेला हा चौक समृद्धी महामार्गाच्या आरंभबिंदूवर उभारण्यात आला आहे... नागपूर जवळच्या शिवमडका गावात समृद्धी महामार्गाचा झिरो माईल्स असून या ठिकाणी नागपूर, अमरावती आणि हिंगणा कडून येणारे मार्ग एकत्रित येतात आणि इथूनच पुढे मुंबईच्या दिशेने समृद्धी महामार्गाचा प्रवास सुरू होतो... अंगणात आपण जशी रांगोळी घालतो तशाच आकारात हे चौक आहे.. समृद्धी महामार्ग अवाढव्य असून त्याच्या आरंभबिंदू रांगोळी असून समृद्धी महामार्गाला शोभावी म्हणून तब्बल 18 एकरात विस्तारलेली ही रांगोळी आहे... या ठिकाणी आकर्षक फुलझाडे लावण्यात आली आहेत.. सोबतच खजूर, पाम आणि सायकस ची झाडे इथे लावण्यात आली आहेत.. इथल्या विजेची सोय करण्यासाठी खास सोलर ट्री उभारण्यात आले असून ते सूर्यफूल सारखे सतत सूर्याच्या दिशेने असतात.





















