एक्स्प्लोर
Nagpur Snail Issue | गोगलगायींमुळे नागपूरकर त्रस्त, घरात ठिकठिकाणी गोगलगायींचा सुळसुळाट
आधीच रोज कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे धास्तावलेल्या नागपूरकरांना एका वेगळ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. दक्षिण नागपुरातील गीतानगर, शाहूनगर, गजानननगर, कपिलनगरसह अनेक वस्त्यांमध्ये गोगलगायींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. परिसरातील बहुतांशी घरात भिंतीवर, दार खिडक्यांवर, घरातल्या वापरातल्या वस्तूवर शंख असलेल्या गोगलगायी दिसून येत आहे. त्यामुळे रोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर परिसरातील नागरिकांना आधी शेकडोच्या संख्येने घरी शिरलेल्या गोगलगायी बाहेर काढाव्या लागत आहे. त्यानंतरच नागरिकांना त्यांचा दिनक्रम सुरु करतात.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion





















