Nagpur : निलंबित काँग्रेस नेते आशिष देशमुख भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला
काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. देशमुख यांनी बावनकुळे यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय... काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात विधान केल्याने देशमुख यांना काँग्रेसने नोटीस दिली . त्याला देशमुख यांनी उत्तरही दिलं . मात्र या नोटिशीवर अजून कोणताही निर्णय काँग्रेसकडून घेण्यात आलेला नाही. त्यापूर्वीच देशमुख यांनी बावनकुळे यांची भेट घेतल्याने राजकीय अर्थ काढले जाऊ लागलेत. देशमुख यांनी बावनकुळे यांच्याकडे ब्रेकफास्ट करण्यासाठी आलो होतो. कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं तर DPDCच्या कामासाठी आशिष देशमुख आले होते अशी प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिलीये.























