एक्स्प्लोर

धक्कादायक! कर्ज 4 लाखांचं अन् वसुली मात्र 97 लाखांची; नागपुरात बडतर्फ पोलिसाला अटक

नागपूर : भरमसाठ व्याज वसूल करून लोकांना देशोधडीला लावणाऱ्या अवैध सावकाराबद्दल "पठाणी व्याज" अशी शब्दावली वापरली जाते. मात्र, जर कोणी 4 लाखांच्या कर्जावर तब्ब्ल 97 लाखांची वसुली करू पाहत असेल, तर तुम्ही त्याला काय म्हणणार? धक्कादायक म्हणजे चित्रपटातील सावकारांना देखील लाजवेल असं भरमसाठ व्याज वसूल करण्याचे प्रयत्न नागपुरात एका बडतर्फ पोलिसाने चालविले होते. मात्र, पीडित कर्जदाराने त्यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर आता या माजी पोलिसावर अटक होण्याची वेळ आली आहे.

नागपूरच्या भगवान नगर भागात राहणाऱ्या मनीष राऊत नावाच्या व्यक्तीने जयंता शेलोट आणि त्याचा भाऊ विजय शेलोटकडून वर्ष 2016 मध्ये 4 लाख रुपये कर्ज घेतलं होतं. काही आर्थिक अडचण असल्यामुळे त्यांनी हे कर्ज घेतलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीष राऊत यांनी कर्जाची परतफेड म्हणून साडेसात लाख रुपये शेलोट यांना परतही केले होते. मात्र, कधीकाळी पोलीस दलात राहिलेल्या जयंता शेलोट यांनी मनीष राऊत यांना अडकवण्याचा प्लान बनवला आणि दमदाटी करत तुझे कर्ज अजून फिटलेलं नाही. व्याजासह मुद्दल 97 लाख रुपये झाली आहे. त्यामुळे तेवढे पैसे परत कर नाही तर तुझं घर आमच्या नावावर कर असा तगादा लावला होता.

घाबरलेल्या मनीष राऊत याने अनेक महिने इकडे-तिकडे लपून काढले. अखेरीस नेहमीच्या दमदाटीला त्रासून मनीष राऊत याने पोलिसांचे दार ठोठावले. अजनी पोलीस स्टेशनच्या पथकानं प्रकरणाचा सखोल तपास करून पूर्वश्रमीचा पोलीस कर्मचारी जयंता शेलोट आणि त्याच्या भावा विरोधात अवैध सावकारी आणि खंडणी मागितल्याचा गुन्हा नोंदवून दोघांना अटक केली आहे.

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 5 August 2026: आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्ट पर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
धक्कादायक! मेघवाडी पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 13 लाखांचा मुद्देमालाही  दरोडा
धक्कादायक! मेघवाडी पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 13 लाखांचा मुद्देमालाही  दरोडा
बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget