Nagpur : वाङ्मय पुरस्कार वितरण सोहळा नागपुरात संपन्न,डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांना ‘जीवनव्रती’ पुरस्कार
विदर्भ साहित्य संघाच्या यंदाच्या शतक महोत्सवी वर्षातील वाङ्मय पुरस्कार वितरण सोहळा नागपुरात सांस्कृतिक संकुलातील रंगशारदा सभागृहात पार पडला... यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, तसेच ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार, शताब्दी महोत्सवाचे संयोजक,संस्थेचे विश्वस्त यांच्यासह विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष उपस्थिती होते..कार्यक्रमात नितीन गडकरी आणि प्रदीप दाते यांच्या हस्ते झाडीबोलीचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांना ‘जीवनव्रती’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.. यावेळी इतरही वाङ्मयीन पुरस्कारांचेदेखील वितरण करण्यात आले.























