एक्स्प्लोर
Bangalore:14 महिन्यांच्या मुलीची प्रकृती विमानात बिघडली,एम्सच्या डॉक्टरांकडून विमानात प्राथमिक उपचार
बंगळूरु येथून दिल्लीला जाणाऱ्या विस्तारा एअर लाईनच्या विमानात एका १५ महिन्यांच्या मुलीची प्रकृती अचानक बिघडली. श्वसनसंबंधी आजार असल्यानं ती बेशुद्ध पडली. सुदैवानं विमानात दिल्लीतील एम्स रुग्णालयात काम करणारे ५ डॉक्टर होते. त्यांनी विमान नागपूरला उतरेपर्यंत या तान्ह्या मुलीवर ४५ मिनिटं उपचार केले. विमान शक्य तेवढ्या लवकर नागपूरमध्ये उतरवण्यात आलं. तिथं रुग्णावाहिका सज्ज होती. त्यातून मुलीला तातडीनं खासगी रुग्णासयात नेण्यात आलं. तिची प्रकृती संध्या गंभीर आहे. डॉक्टरांनी काय माहिती दिलीये तेही पाहूयात
आणखी पाहा























