(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Swatantrya Veer Savarkar यांची बदनामी करण्यात आलीय यात तथ्य; लेखक वैभव पुरंदरे 'माझा'वर
सावरकरांची बदनामी करण्यात आली आहे यात तथ्य आहे. मात्र जे राजनाथ सिंह म्हणाले यात त्यांचा संदर्भ चुकला असल्याचं मत सावरकर : द ट्रू स्टोरी ऑफ द फादर ऑफ हिंदूत्वाचे लेखक वैभव पुरंदरे यांनी व्यक्त केलं आहे. १९२० साली नारायणराव सावरकरांनी महात्मा गांधी यांना पत्र लिहीले होते. ज्यात नारायणराव गांधींना म्हणतायत की इंग्रज आता अनेक राजकीय कैद्यांना सोडतायत पण ते सावरकर बंधूंबद्दल काही बोलत नाहीत. अशावेळी महात्मा गांधी नारायणराव यांना पत्र लिहीत म्हणतायत की तुम्ही इंग्रजांना पत्र लिहीत कळवा की त्यांच्यावरील गुन्हे हे राजकीय आहेत. मात्र, सावरकरांनी १९११ सालापासूनच ७ दया याचिका लिहिलेल्या आहेत. त्या महात्मा गांधींच्या सांगण्यावरून लिहिलेल्या नाहीत. ह्यात त्यांनी स्वत:बद्दलच नाही तर इतर राजकीय कैद्यांना देखील सोडा असं सावरकर सतत म्हणत होते असं देखील पुरंदरे म्हणालेत. यासंदर्भात त्यांच्याशी बातचीत केलीय आमच्या प्रतिनिधींनी…