एक्स्प्लोर
Raj Uddhav Thackeray Alliance | राज-उद्धव एकत्र, युतीचा संभ्रम कायम! युती होणार की नाही?
राज आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर आल्याने कार्यकर्ते आणि जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ५ जुलै रोजी एकत्र आलेले ठाकरे बंधूंचे पक्ष भविष्यात एकत्र येणार की नाही, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. एका बाजूला, राज ठाकरे यांनी प्रवक्ते आणि नेत्यांना जाहीरपणे बोलण्याचे आदेश दिले आहेत, तर दुसऱ्या बाजूला मनसेच्या नेत्यांनीही युतीसंदर्भात खुलेपणाने बोलणे टाळले आहे. बाळा नांदगावकर यांच्या "आधी एकटे लढलो, पुढे वेळ आली तर एकटे लढण्याची तयारी करू" या प्रतिक्रियेमुळे मनसे-सेना युतीसंदर्भातला संभ्रम आणखी वाढला आहे. दुसरीकडे, ठाकरे यांच्या शिवसेनेकडून युतीसाठी तयार असल्याचे आणि ही युती लवकरात लवकर व्हायला हवी अशा प्रतिक्रिया नेत्यांकडून येत आहेत. त्यामुळे युतीचे निमंत्रण काय होणार, याची चर्चा सुरू झाली आहे. "वेळ आली तर आपल्याला एकटेच आपण लढविण्याच्या भूमिकेमध्ये आहोत," असे एका नेत्याने म्हटले आहे. प्रत्येक पक्ष आपली वाढ कशी होईल, मग ती महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, ग्राम पंचायत, विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत असो, याचा विचार करत असतो. युतीबाबत प्रश्न विचारला असता संदीप देशपांडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया न देताच निघून जाणे पसंत केले.
मुंबई
Mahayuti Full PC : मुंबई शिवसेना-भाजपचा 150 जागांवर एकमत, नवाब मलिक यांच्यासोबत जाण्यास विरोध
Sanjay Raut PC : ...तर एकनाथ शिंदे जेलमध्ये जातील, संजय राऊतांनी सगळंच काढलं
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Thackeray Brother Alliance : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची शेवटची सभा ठाकरे बंधू एकत्र घेणार?
आणखी पाहा























