Sadabhau Khot on ST Workers Strike : आंदोलन रबरासारखं, जास्त ताणल्यास तुटतं : सदाभाऊ खोत ABP Majha
ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या लालपरी संदर्भात मोठी बातमी... गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची आशा निर्माण झालीय. आंदोलन हे रबरासारखं असते, जास्त ताणल्यास तुटतं अशी सूचक प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिलीय. एसटीच्या विलिनीकरणासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत कर्मचाऱ्यांना वेतनात अंतरिम वाढ देण्याचा सरकारने प्रस्ताव दिलाय. या प्रस्तावावर एसटी कर्मचारी संघटना सकारात्मक असल्याचं समजतंय. भावनिक विचार न करता आर्थिकदृष्टीने देखील विचार व्हावा आणि यासंदर्भात सकाळी १० वाजता काही अर्थतज्ज्ञांशी चर्चा करु असं खोत यांनी म्हटलंय. तसंच शिष्टमंडळाशी चर्चा करुन सरकारसोबतच्या बैठकीतून तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही खोत यांनी दिलीय.























