Ravikant Tupkar Health : तुपकरांची प्रकृती खालावली, मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचारासाठी दाखल
सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सलग ५ दिवस अन्नत्याग आंदोलन चालू होत, तर २८ नोव्हेंबर रोजी मुंबई मंत्रालयाचा ताबा घेण्यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवून हजारो शेतकऱ्यांसह तुपकरांनी मुंबईत धडक दिली. त्यानंतर राज्य सरकारकडून त्यांना चर्चेचे निमंत्रण दिले गेले व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहा वर बैठक पार पडली, या बैठकी नंतर रविकांत तुपकर यांनी आपल आंदोलन दोन आठवडे स्थगित केल्याचं नाही केलं......परंतु सलग ५ दिवस केलेल्या अन्नत्याग आंदोलनामुळे रविकांत तुपकरांची प्रकृती प्रचंड खालावली असून त्यांचे ब्लड प्रेशर, शुगर लेव्हल कमी झाली आहे, तर किडनीवर ही परिनाम झाला असून मध्यरात्री त्यांना उपचारासाठी त्यांना मुंबईतील चर्नी रोड भागातील सैफी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.