Ramdas Kadam Viral Phone Call : रामदास कदम यांना कट्टर शिवसैनिकाचा फोन, कॉलवरच एकमेकांना शिवीगाळ
Ramdas Kadam : रामदास कदम यांना कट्टर शिवसैनिकाचा फोन. त्याच फोनवर त्यांनी एकमेकांना शिवीगाळ केला आहे. माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिवसेना (Shiv Sena) नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कामकाजावर टीका करत त्यांनी नेतेपदाचा राजीनामा दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी नेतेपदी माझी नियुक्ती केली होती. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर या पदाला काहीच अर्थ राहिला नाही, असं रामदास कदम म्हणाले. "माझ्यावर अनेकदा टीका करण्यात आली. मात्र माझं म्हणणं मांडण्यासाठी मला मीडियासमोर कधीच जाऊ दिलं नाही. एवढेच नाही तर मला आणि माझा मुलगा योगेश कदम आमदार याला वारंवार अपमानित करण्याचा प्रयत्न पक्षातून झाला," असा आरोप रामदास कदम यांनी केला.























