(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Parambir Singh : परमबीर सिंह प्रकरणात गृहमंत्री वळसे पाटील यांनी बोलावली बैठक
परमबीर सिंह प्रकरणात गृहमंत्री वळसे पाटील यांनी बैठक बोलावली आहे. मुंबई आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांसोबत गृहमंत्री वळसे पाटील यांची बैठक होणार आहे. परमबीर सिंह यांच्यावर नोंदवलेल्या गुन्ह्यांसंदर्भात माहिती घेणार असल्याची माहिती आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) अटक होण्याच्या भितीनं देश सोडून परदेशात गेले असावेत, असा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणांना संशय आहे की, परमबीर सिंह युरोपातील देशात लपले असावेत. मात्र, त्यासंदर्भातील पुरावा अद्याप यंत्रणांना मिळालेला नाही. अँटीलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या एनआयएनं परमबीर सिंह यांचा चौकशीसाठी अनेकदा समन्स जारी केलं आहे, मात्र त्यांना अद्यापपर्यंत ते डिलिव्हर झालेलं नाही. एनआयए आणि महाराष्ट्र राज्यातील चौकशी एजन्सींना संशय आहे की, ते अटकेच्या भीतीनं देश सोडून पळाले आहेत.