Mumbai क्रिडा संकुल खासगीकरणावरुन Kishori Pednekar विरोधात Nitesh Rane यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
Nitesh Rane Letter to CM : भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामुळं सध्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. महापौरांनी मुलुंडमधील क्रिडा संकुल, जलतरण तलाव आणि अंधेरेतील शहाजीराजे भोसले क्रिडा संकुलाच्या खाजगीकरणाचा घाट घातल्याचा आरोप केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी तातडीनं याप्रकरणी लक्ष घालावं आणि योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करु, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पुत्र आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र पाठवलंय. मुलुंडमधील क्रिडा संकुल, जलतरण तलाव आणि अंधेरेतील शहाजीराजे भोसले क्रिडा संकुलाच्या खाजगीकरणाचा महापौरांचा डाव असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. ललितकला प्रतिष्ठानचे विशेष कार्यकारी अधिकारी देवेंद्र कुमार जैन यांच्या हस्तक्षेपानं हा खाजगीकरणाचा घाट घातल्याचं नितेश राणेंनी या पत्रात म्हटलं आहे. तसेच त्यांनी महापौर किशोरी पेडणेकर, विशेष कार्यकारी अधिकारी देवेंद्र कुमार जैन यांची चौकशी करुन खाजगीकरण करण्याची मागणी केली आहे. अन्यथा ललितकला प्रतिष्ठानचे एक हजार कर्मचारी घेऊन रस्त्यावर उतरू अशा इशाराही नितेशa राणेंनी दिला आहे.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
