Mumbai Drugs : मुंबईतील ड्रग्ज तस्करांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईची आकडेवारी थक्क करणारी
Mumbai Drugs : मुंबईतील ड्रग्ज तस्करांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईची आकडेवारी थक्क करणारी पुण्याच्या बारमध्ये ड्रग्ज सेवनाची घटना समोर आल्यानंतर मुंबईत ड्रग्ज तस्करांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईची आकडेवारीही थक्क करणारी आहे. मुंबई पोलिसांनी मागील पाच महिन्यात ४७३ कोटी ७ लाख २१ हजार ८९० रुपयांचं ड्रग्ज पकडण्यात आले आहे पोलिसांच्या पाच महिन्यातील कारवाईत ५७० गुन्हे दाखल करण्यात आले असून ६८६ जणांना आतापर्य़त अटक करण्यात आली आहे मुंबईत सर्वाधिक गुन्हे हे गांजा व MD तस्करीचे नोंदवण्यात आले आहेत पोलिसांनी आता पर्यंत गांजा तस्करीत ३५१ गुन्हे दाखल केले असून त्यात ३७० जणांंना अटक केली आहे तर एमडी ड्रग्ज तस्करीत १२६ गुन्हे दाखल केले असून १९३ जणांवर अटकेची कारवाई केली आहे. त्या पाठोपाठ कोकेनचे १० गुन्हे, हॅरोईनचे १८ गुन्हे, चरसचे २५ गुन्हे व अन्य २ असे एकूण ५३ गुन्ह्यात ७६ जणांना अटक केली आहे पोलिसाच्या एकूण कारवाईत ८३४ किलो १८ ग्राॅमचं अंमली पदार्थ पोलिसांनी आतापर्यत जप्त केले आहे तर ड्रग्जचं सेवन केल्याप्रकरणी २९३२ जणांवर गुन्हे दाखल केले असून ३६४० जणांवर कारवाई आतापर्यंत करण्यात आली आहे