Mumbai Metro : मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मेट्रोची रखडपट्टी ; मागाठाणे स्टेशनवर मेट्रो मध्येच पडली बंद
सलग तिसऱ्या दिवशी मुंबईत नव्या मेट्रोची रखडपट्टी पाहायला मिळाली. मागाठाणे स्थानकात मेट्रो मध्येच बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना त्या मेट्रोमधून उतरुन दुसऱ्या मेट्रोने प्रवास करण्यास सांगण्यात आलं. ओवरीपाडा स्टेशनवरही मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे प्रवाशांना तिकीटाचे पैसे परत करण्यात आले. उद्घाटनाच्या दिवशीही मेट्रो बंद पडली होती. तसंच कालही बिघाड झाल्याने मेट्रोचे दरवाजे उघडत नव्हेत. सलग तिसऱ्या दिवशी नव्या मेट्रोमध्ये होणाऱ्या बिघाडामुळे मुंबईकरांमध्ये संतापाचं वातावरण आहे. सोशल मीडियावरही प्रवाशांनी संतप्त भावना व्यक्त केल्यात. एमएमआरडीएने इतकी घाई का केली असे सवाल प्रवाशांकडून विचारले जातायत..





















