Mumbai : मुंबईत कुरार गाव मेट्रो स्थानकाच्या कामासाठी अडथळा ठरणाऱ्या घरांवर बुलडोझर
मुंबईतील मालाड परिसरातल्या कुरार गाव मेट्रो स्टेशनच्या कामात अडचणीची ठरणारी घरं पाडण्यावरुन मोठं रणकंदन माजलं. बेकायदेशीर कारवाई होत असल्याचा आरोप करत स्थानिकांनी विरोध केला. त्यामुळे पोलिसांनी गाडीत डांबून नग्न करुन मारहाण केल्याचा आरोप स्थानिकांचा आहे. तर, स्थानिकांच्या समर्थनार्थ आणि कारवाईविरोधात आलेल्या भाजप आमदार अतुल भातखळकरांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी पोलिसांनी स्थानिकांशी बोलू न देता, ऐकू न घेता आपली अडवणूक केल्याचा आरोप भातखळकरांनी केला. शिवाय, रात्री 12 वाजता नोटिसी देऊन सकाळी 9 वाजता घरं पाडल्याचा आरोप भातखळखरांनी ट्विटद्वारे केलाय. सध्या अतुल भातखळखर पोलिसांच्या ताब्यात आहेत. दरम्यान, ऐन पावसाळ्यात नागरिकांच्या घरावर हातोडा का? असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित झालाय.



















